पीक पेरा मोहिमेत सामील होऊन प्रगतशील शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा – उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांचे आवाहन
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
राज्य शासनाच्या माझी शेती माझा 7 /12 ,मीच नोंदविणार माझा पीक पेरा मोहिमेत सामील होऊन प्रगतशेतकरी बनण्याचस प्रयत्न करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे.खालापूर तालुक्यातील वावोशी मंडळात होराळे ग्रामपंचायत हद्दीत शेतकरी यांच्या साठी माझी शेती माझा 7 /12 ,मीच नोंदविणार माझा पीक पेरा या योजनेचे प्रशिक्षण प्रत्यक्ष होराळे गावातील शेतावर करून दाखविण्यात आले. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अजित नैराळे बोलत होते.
खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांचे मार्फत गावोगावी तलाठी यांच्या मार्फत प्रशिक्षण सुरू आहे. याचा लाभ शेतकरी यांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना आणली आहे. खालापूर तहसील कार्यालयाच्या वतीने होराळे या गावात शेतकरी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण झाले,ई-पीक पहाणी मोबाईल अँप द्वारे डिजिटल 7 /12 आणि ई-पीक पहाणी प्रकल्पामुळे पीक विमा व पीक कर्ज मिळने अधिक सुलभ होणार असल्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी सांगितले.
यात पिकांच्या नोंदी घेण्यासाठी शेतकरी यांचा थेट सहभाग असल्याने पीक पाण्याची अचूक आकडेवारी मिळणार आहे. पीक शेतात उभे असतानाच पिकाची नोंद होणार आहे. त्यामुळे 7 /12 अद्यावत होणे सुलभ व सोयीचे झाले आहे.
कार्यक्रमास माजी सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, माजी उपाध्यक्ष भाई शिंदे,नायब तहसीलदार राजश्री जोगी,मंडळ अधिकारी तुषार कामत,नितीन परदेशी,जेष्ट पत्रकार अंकुश मोरे यांच्यासह दोन्हीही गावातील शेतकरी, तलाठी,मंडळ अधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment