सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत इयत्ता १२ वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या आणि त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून कै द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय व ज्युनियर कॉलेज कोलाड येथे शिक्षण घेत असलेल्या विज्ञान शाखेतून कु राहुल सुखाराम सोरेन या विद्यार्थ्याने एकूण ७४ .७६ % गुण संपादक करत कॉलेजमध्ये तिसरा आला आहे, कु.राहुल हा एका गरीब कुटूंबात जन्माला आलेला मुलगा याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाक्याचीअसु आई वडिलांचा एकटा मुलगा आहे.कामात आई वडिलांना नेहमीची मदत करत शाळेचे शिक्षण घेत असून वडील हे सिव्हिल कामात मोलमजुरी करतात.तर आई ही घरकाम करत भाडे खोलीत राहून घर चालवून त्याला शिक्षण देत आहेत तसेच राहुल याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत देखील चांगली टक्केवारी मिळवून गणवत्ता यादीत येत नव्वद टक्के हुन अधिक गुण मिळवत आपले आई वडील व शाळेचे नाव उज्वल करत पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोलाड येथील ज्युनियर कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि इयत्ता बारावी मध्ये देखील चांगले गुण संपादित करत बाजी मारली आहे. राहुलच्या यशाबद्दल ज्युनियर कॉलेज कोलाड येथील प्राचार्य काळे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक आणि शिक्षण प्रेमींनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.






Be First to Comment