Press "Enter" to skip to content

संतापजनक : नागोठण्याजवळील मांडवशेत आदिवासी वाडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असूनही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सर्वेश संतोष पवार (वय १८) रा. मांडवशेत आदिवासी वाडी, पो. ऐनघर, ता. रोहा या आरोपीवर बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण कायदा २०१२ व भा.दं.वि. संहितेच्या कलम ३७६ च्या विविध कलमांखाली नागोठणे पोलिस ठाण्यात २३ आॅगस्ट, २०२१ रोजी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नागोठणे पोलिसांकडून आरोपीस अटक करुन मंगळवारी(दि.२४) रोहा येथील फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून आरोपीस २७ आॅगस्ट पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

यासंदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार १५ वर्ष वय असलेल्या नागोठण्याजवळील मांडवशेत (ता.रोहा) येथील अल्पवयीन मुलीशी ती अल्पवयीन आहे हे माहीत असूनही आरोपी सर्वेश पवार याने तिच्याशी प्रेमसंबध ठेवले. तसेच तिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी तिच्या मांडवशेत येथीलच घरात २३ मार्च, २०२१ ते २३ आॅगस्ट, २०२१ दरम्यान या मुलीशी तिच्या मनाविरूद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन या मुलीस ५ ते ६ महिन्यांची गर्भवती ठेवली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारी वरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याची माहिती मिळताच रोहाचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात भेट देऊन सदर गुन्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यातील स.पो.नि. विजयकुमार देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.