सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील मुठवली बुद्रुक येथील लक्ष्मण अंबाजी कापसे वय वर्षे ४६ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुठवली गावासह खांब परिसरात शोककला पसरली आहे. मुठवली येथील लक्षण कापसे हे खांब येथे वास्तव्यास होते २० जुलै रोजी ते काही कामानिमित्ताने घरातून बाहेर पडले होते. परंतु घरातून खांब नाक्यावर जात असताना रस्त्याच्या कडेला पुरातन काळातील विहीर व येथील खड्डा अंदाज न आल्याने त्यांचा तोल सदरील विहीरीत जाऊन त्यांना दुर्दैवी दुःखद निधन झाल्याने कापसे कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे, सद्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजकेच नागरिक उपस्थित होते.मात्र असंख्य नागरिकांनी त्यांना मोबाईलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.त्यांच्यावर त्याच्या मूळ गावी मुठवली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुली, भाऊ,भावजया,पुतणे,नातवंडे व मोठा कापसे परिवार असून मराठी कापड उद्योजक रामशेठ कापसे यांचे ते सख्खे चुलत भाऊ तर कोलाड विभागातील सामाजिक कार्यकर्ते अजय लोटणकर हे त्यांचे थोरले जावई आहेत.त्यांचे दशक्रिया बुधवार दि.२९ जुलै २०२० रोजी तर उत्तरकार्य शुक्रवार दि. ३१जुलै रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मुठवली येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे,






Be First to Comment