Press "Enter" to skip to content

महीलांनो रहा सावधान : मोटारसायकलवर फिरणारे चोर गंठण खेचून होतात पसार

पनवेल तालुक्यात गंठण चोरांचा सुळसुळाट : चोरांची दहशत ग्रामीण भागात ही पोहचली

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

मोटारसायकलीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण खेचून पसार झाल्याची घटना तालुक्यातील केळवणे-खारपाडा टोल नाका रोडवर कातकरवाडी बस स्टॉपजवळ घडले आहे.
         

सुनिता मोकल (वय-55) या रिक्षातून साईगाव येथे येऊन त्या रिक्षातून उतरल्यावर डोक्यावर हेलमेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलीवरून येऊन त्यामागील पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसका देऊन खेचली यात साधारण 10 तोळ्याचे अर्धवट तुटलेले गंठण ज्याची किंमत जवळपास 90 हजार आहे. खेचून ते पसार झाले आहेत. या घटनाची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.