सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
24 जुलै 1989 रोजी पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये जीव गमावलेल्यांचा स्मृती स्तंभ कष्टकरीनगर येथे बांधण्यात आला आहे. दर वर्षी या स्तंभांची रंगरंगोटी करुन या स्तंभांची पुष्प हार व श्रीफळ अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येते.
यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टींक्शन पालत हा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार गौतम सोनावणे हे उपस्थित होते.त्यांच्याहस्ते पाताळगंगा नदिच्या पुरात जीव गमावलेल्या स्तंभाला पुष्पहार व श्रीफळ वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेली तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड, दादासो आटपाडकर, काका गायकवाड,सुनिल राठोड,भिमू राठोड, नजमा साखरकर व ईतर कार्यकर्ते यांनीही पुष्पहार व श्रीफळ अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली.






Be First to Comment