सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुका क्रुषी विभागामार्फत देवकान्हे येथे चारसुत्री भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.
रा.जि.परिषद अलिबाग यांच्याकडून तसेच अनेक संस्थांकडून क्रुषीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आलेले देवकान्हे गावचे क्रुषीनिष्ठ शेतकरी नथुराम हिरू भोईर यांच्या शेत जमिनीवर सदरचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तालुका क्रुषी अधिकारी कुमार जाधव, मंडळ क्रुषी अधिकारी महादेव करे,पर्यवेक्षक जगन्नाथ मढवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली क्रुषी सहाय्यक सारिका दिघे यांनी स्वतः भोईर यांच्या शेत जमिनीवर सदरचे प्रात्यक्षिक दाखविले.या पद्धतीत रोपांची लागवड एका सरळ रेषेत केली जात असल्याने शेतीतील अनावश्यक तण काढणे सोपे जाते.त्यामुळे खताची मात्राही कमी लागते.तसेच पिक जोमदार येत असल्याने ही लागवड शेतकरी वर्गाला एका अर्थी वरदानच ठरत असल्याचे क्रुषी सहाय्यक सारिका दिघे यांनी या लागवडीचे प्रात्यक्षिक प्रसंगी सांगितले. तसेच प्रत्यक्ष भात कापणीचे वेळी कापलेल्या भाताची कणसेही एका रांगेत ठेवता येत असल्याने मळणी तसेच बांधणीचे कामही सोपे होऊन जाते.सध्या शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला असल्याने प्रत्यक्ष भात कापणीचे वेळी यांत्रिक पद्धतीने भाताची कापणी व मळणी करणेही अतिशय सोपे जात असल्याने ही पद्धत जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने स्विकारली पाहिजे असेही शेवटी त्यांनी सांगितले.तर क्रुषीनिष्ठ शेतकरी नथुराम भोईर यांनी चारसुत्री पद्धतीने भाताची लागवड करण्यात एक वेगळाच आनंद वाटत आहे. यामुळे लागवडीचे काम पटकन व जलदगतीने होत असल्याने फारशा मजुरांची आवश्यकता नसल्याने ही लागवड शेतकरी वर्गासाठी नक्कीच फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले.






Be First to Comment