Press "Enter" to skip to content

कॅमलिन कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिला कामगाराचा विनयभंग

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकाऱ्याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार याच कंपनीत काम करणाऱ्या महिलेने रसायनी पोलिस ठाण्यात केली आहे.

याबाबत कॅमलिन कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमलिन कंपनीमध्ये काम करणा-या एका महिलेशी कंपनीमधील अधिकारी दिलीप तायडे हा गेल्या काही महिन्यांपासून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता.सदर पिडीत महिला ज्या-ज्या ठिकाणी जायची त्याठिकाणी तायडे तिच्या पाठीमागे जात असे व तेथे जाऊन मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करायचा.सदर बाबत व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता तू तुझे आठ तास काम कर, कामाच्या ठिकाणी हे चालतच राहणार,तुझ्यामुळे तायडे साहेब कंपनी तळोजा येथे घेवून जाणार आहेत अशी दमदाटी करून पिडीत महिलेला गप्प केले जात असल्याचे तक्रारीत पिडीत महिलेने म्हटले आहे.अखेर या जाचाला कंटाळून सदर प्रकार महिलेने आपल्या नातेवाईकांना सांगितला.

सदरबाबत वारंवार कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करुनही तायडेच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर पिडीत महिलेने रसायनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली.याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भादंवि कलम 354,354 ड,509,506,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला व गोरक्षनाथ बाळवडकर अधिक तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.