सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #
अनेक वर्षांपासून येथील प्रभाग सहा मध्ये प्रलंबित असलेल्या विकास कामांना
नगरसेविका प्रतिभा घावरे यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळत आहे.
आजवर या प्रभागात अनेक दिग्गज मंडळी निवडून आली होती परंतु सर्वांनी इकडे कानाडोळा केला होता.एखादंवेळ फक्त नावापुरता पाहणी दौरे करण्यात आले होते. परंतु इथल्या नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत सुविधा लक्षात घेऊन मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रभाग सहा मधील रेल्वे स्टेशन या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून सर्वांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकताच पावसाळ्यात वाहुन जाणारे पाणी काही लोकांच्या घरात शिरत होते त्यासाठी लोकांना पावसाळी पाण्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करून गटारे बांधण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे.
त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.याचबरोबर येथील मंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉक लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि लवकरच मंदिर परिसरात ही कामे सुध्दा पूर्ण केली जाणार आहेत असे आश्वासन प्रतिभा घावरे यांनी दिले आहे.मागील काळात एमएमआरडीए मार्फत बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाच्या सुशोभीकरणासाठी संबंधीत अधिकारी वर्गाशी चर्चा केली असून ही महत्वपूर्ण कामे लॉक डाऊन संपण्याच्या अगोदर मार्गी लागतील असेही प्रतिभा घावरे यांनी सांगितले आहे.
आजवर त्यांनी केलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.






Be First to Comment