श्री विश्वकर्मा चॅरिटीबल ट्रस्ट रेड ब्रिगेड, मानव आधीकार संस्थान उलवे आणी आम्ही उलवेकर मित्र मंडळ यांचा उपक्रम
सिटी बेल लाइव्ह / उलवे नोड #
श्री विश्वकर्मा चॅरिटीबल ट्रस्ट रेड ब्रिगेड, नवी मुंबई या संस्थेने आपल्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त मानव आधीकार संस्थान उलवे, आणी आम्ही उलवेकर मित्र मंडळ यांच्यासह सेक्टर 9 प्लॉट नंबर 22, भगवती हरी हेरिटेज येथे वृक्षरोपण केले. याप्रसंगी तब्बल 100 बहुपयोगी झाडांची लागवड करण्यात आली.
साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास रमेश ठाकूर, गोपाळ जांभळे, सचिन राजे येरुणकर, मंगेश सावंत, अमित जयस्वाल, संदीप पाटील, किशोर कदम, हरिश्चन्द्र भागत आदि मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment