किरण मढवी यांनी केली खारफुटीच्या रोपांची लागवड
सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (मनोज पाटील)
नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी असो किंवा आत्ता नव्याने ऊभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी असो यासाठी खुप मोठ्या प्रमाणावर खारफुटीच्या वृक्षांची कत्तल झाली आहे. या खारफुटीचे महत्व लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे या उद्देशाने उलवे येथील समाजसेवक किरण मढवी यांनी २६ जुलै रोजी जागतिक खारफुटी संवर्धन दिनानिमीत्त उलवे शहरालगत असलेल्या मोहा गावाच्या समोरील खाडी किनारी खारफुटीची रोपे लावुन हा दिन साजरा करण्यात आला.
खाऱ्या जमिनीत फुटणारी झाडे म्हणून यांना खारफुटी तसेच कांदळवन, तिवीर या नावाने देखील म्हणुन ओळखले जाते. या वनस्पतीमधे प्रदुषण शोषण्याची ताकद खुप जास्त आहे. मासे, खेकडे, कीटकांचे ही वनस्पती म्हणजे नैसर्गिक अन्न आहे. तसेच सागरी लाटा, उधाण, पुर, मोठे वादळांपासुन बचाव करणारी एक नैसर्गिक संरक्षण भिंत म्हणुन कार्य बजावते. या झाडांमुळे पाणी व जमिनीचा समतोल राखला जातो. भविष्यात खारफुटी वाचली तर मानवी जीवन वाचेल ह्या हेतुनेच खारफुटीच्या रोपांची लागवड करुन समाजसेवक किरण मढवी यांनी समाजासमोर नवा आदर्श घालुन दिला आहे. एकीकडे कोरोना महामारी संकट, लॉकडाऊन, त्यात पावसाळा असुनही ह्या प्रसंगी वेळात वेळ काढुन समाजसेवक किरण मढवी यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.






Be First to Comment