Press "Enter" to skip to content

पनवेल परिसरात वीज चोरीचे वाढते प्रकार ; वीज चोरांवर गुन्हे दाखल

फार्महाऊस, हाॅटेल मालक, व्यावसायीक करीत आहेत मोठ्या प्रमाणात वीजेची चोरी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

गेल्या काही महिन्यांपासून पनवेल परिसरात अनेक ठिकाणी वीजचोरीचे वाढते गुन्हे होत असून याबाबत सर्वच पोलिस ठाण्यात कारवाईच्या तक्रारी करण्यात आल्या असून त्यानुसार म.रा.वि.वि.चे अधिकारी व कर्मचारी गुन्हे दाखल करीत आहेत.

अनेक ठिकाणच्या राहत्या घरामध्ये, फार्महाऊस, हॉटेल व इतर कंपन्या याठिकाणी बेकायदेशीररित्या किंवा युनिटची अनधिकृत वीज चोरी करून वीज वापरली जात आहे व शासनाची फसवणूक करण्यात येत आहे.

याची माहिती म.रा.वि.वि.चे अधिकारी व कर्मचारी यांना मिळताच ते सदर ठिकाणी जाऊन अशा प्रकारे वीज चोरी करणाऱ्यांविरूद्ध संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत आहे. अशा धडक कारवायांमुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.