खो खो ला देखील ग्लॅमर मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध : रवीशेठ पाटील
सिटी बेल | पनवेल |
वेग, चपळता आणि तांत्रिक बारकावे त्यांचा एकत्रित संगम म्हणजे खो-खो. मैदानी खेळांच्यातील अग्रगण्य अशा या खेळाचे अस्तित्व सध्या शाळा,कॉलेज पातळ्यांवर असे मर्यादित राहिले आहे. या खेळाला ग्लॅमर प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा असोसिएशन ने महत्त्वाची पावले उचलली आहेत.
असोसिएशनच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी आमदार अनिकेत तटकरे यांची निवड झाली असून रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवी शेठ पाटील यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. रवीशेठ पाटील हे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे उपाध्यक्ष असून विविध क्रीडा स्पर्धा आयोजनात त्यांनी भरीव कामगिरी करून दाखविली आहे. भव्य दिव्य स्वरूपाची, रेकॉर्ड ब्रेकिंग धावपटू असणारी मॅरेथॉन, धडाकेबाज स्वरूपाच्या नाईट क्रिकेट टूर्नामेंट, कबड्डीचा हुंकार आणि न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची खो-खो प्रीमियर लीग अशा अभूतपूर्व स्पर्धा आयोजित करणारे रवीशेठ पाटील “खेळाडू निर्माण करणे ही एक सेवा आहे” इतक्या नम्र भावनेने हे कार्य करत असतात.
रवीशेठ पाटील यांच्या या महत्त्वपूर्ण पदावर झालेल्या निवडीबद्दल सिटी बेल मीडिया हाऊसच्या टिमने त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले त्याचप्रमाणे त्यांनी खोखो या खेळाच्या विकासासाठी याआधीही केलेल्या प्रयत्नांबद्दल जाणून घेतले त्याच प्रमाणे भविष्यात ते खो-खो या खेळासाठी काय करू इच्छितात याबाबत देखील माहिती घेतली…पाहुयात काय म्हणालेत रवीशेठ पाटील.








Be First to Comment