Press "Enter" to skip to content

खोपोली पोलीस ठाणे हद्दीत ढेकू गावात घडली खळबळजनक घटना

नात्याला काळीमा : नराधम दिराचा वहिनीवर बलात्कार, दिराला अटक

सिटी बेल | खालापूर |
मनोज कळमकर |

नात्याला काळिमा फासणारे कृत्य वासनेने वखवखलेल्या दिराकडून ढेकू गावात घडले असून वाहिनीवर दोनदा बलात्कार केला आहे. नराधम दिराला पोलिसांनी अटक केली आहे .17 ऑगस्ट पर्यंत नराधमाला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पीडित महिला ही पती मुलं आणि दिरासह शंकर मंदिर समोर ढेकु खालापूर येथे राहते. घरामध्ये पती व मुलासह झोपली असताना दिर चौरासिया याने तिच्यावर बलात्कार केला. पीडीतेला वाटले की तीचा पती आहे परंतु तेव्हा तिला जाग आल्यावर दिराला पाहुन ती मोठयाने ओरडली असता त्याने तिला उताणी पाडून तिचे तोंड दाबुन ठेवुन व पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

भेदरलेल्या पीडितेने दिराने केलेले दुष्कृत्य पतीला सांगितल्यानंतर पतीला धक्का बसला.पत्नीला घेऊन थेट खोपोली पोलिस ठाणे गाठत तक्रार देण्यात आली.सदर गुह्यातील आरोपी दिरास अटक करण्यात आली असून त्याचे विरोधात भा.द.वि कलम 376(2)(एन),506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मसपोनि पाडोळे ह्या करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.