Press "Enter" to skip to content

माजी सरपंच संदिप मुंढे यांच्याकडून अपंग बांधव व जेष्ठ नागरिकांना मोफत लसीकरण

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे.यातच रसायनी पाताळगंगा परिसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली आहे.यातच परिसरातील नागरिकांना संरक्षण मिळावे यासाठी माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या प्रयत्नातून मोहोपाडा उपकेंद्र येथे लसीकरण सुरु करण्यात आले होते.परंतू महिनाभरापासून लसीचा तुटवडा भासू लागल्याने जेष्ठ नागरिकांना व अपंगबांधवांना वणवण फिरावे लागत आहे.यातून या बांधवांना होणारा मानसिक त्रास माजी सरपंच संदिप मुंढे यांनी लक्षात घेऊन रसायनी व आसपासच्या परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी व अपंग बांधवांसाठी मोफत पाचशे कोविशिल्ड लसीकरण मोहीम राबविली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवार दि.१५ आॅगस्ट रोजी चांभार्ली हरिओम पार्कं येथील वरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्था आवारात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिम राबविण्यात आली.
आपल्या परिसरातील जेष्ठ नागरिक व अपंग बांधवांसाठी माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या प्रयत्नातून स्वखर्चाने हे लसीकरण करण्यात आले.यावेळी नागरिकांची मोफत अॅटिजेन तपासणीही करण्यात आली.

सकाळपासून दुपारपर्यंत जवळपास पाचशे नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा डोस घेतला.या लसीकरणासाठी अश्विनी हाॅस्पिटलकडून नर्स व स्टाफ पुरविण्यात आला होता.माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या प्रयत्नातून पाचशे नागरिकांना मोफत लसीकरण मिळाल्याने त्यांनी माजी सरपंच संदिप मुंढे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे यांचे आभार मानले.यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध काम केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.