लाॅकडाऊन मध्ये सरकारने केले रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष
सावळे देवळोली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आंदोलन
सिटी बेल लाइव्ह / रसायनी #
कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट आले असताना रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आज सावळे देवळोली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने वारंवार करण्यात येणाऱ्या लाॅकडाऊन चा निषेध करण्यात आला. तसेच शासनाला रिक्षाचालकांच्या मागण्या आॅनलाईन पद्धतीने पाठविण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांचा सरकारने विचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आमचे रिक्षाचालक कोरोना मुळे कमी आणि उपासमारी मुळे जास्त मरत आहेत. आजपर्यंत सात जणांनी आत्महत्या केली आहे. जर का सरकारने रिक्षाचालकांना आर्थिक मदत केली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्यावेळी आम्ही जीवाची पर्वा न करता उपोषणाला बसु
रिक्षा संघटना संघटना पदाधिकारी
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले देवळोली येथील शेकापक्षाचे युवा नेते, रायगड जिल्हा पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र अनंत पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावळेचे सरपंच शिवाजी माळी, उपसरपंच भालचंद्र म्हसकर, मा.उपसरपंच संदीप माळी, रिक्षा चालक मालक संघटनेचे संघटनेचे पदाधिकारी एम बी माळी, विनोद पाटील, मल्लीकुमार जत्ती, हरिश्चंद्र पाटील, सुहास पवार, बाळाराम माळी, हनुमंत माळी, सुरेश माळी, संतोष माळी, दत्तात्रय पाटील, केतन पाटील, राजेश पाटील, नारायण उपाध्याय, संतोष गाताडे, संजय जाधव, गुरुनाथ गाताडे व परशुराम गाताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






Be First to Comment