Press "Enter" to skip to content

अंगणवाड्यांना प्रथमोपचार पेट्यांचे वाटप

सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

सिटी बेल लाइव्ह / रोहा/समीर बामुगडे #

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्तानचे नेते सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त २५ जुलै रोजी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सकाळच्या सत्रात तरुणांना श्रमदानाचे महत्व कळावे यासाठी संतोष ठाकूर यांनी तीन वर्षणपूर्वी लावलेल्या झाडांची गवत काढुन मशागत करून श्रमदान रुपी शुभेच्छा दिल्या व दुपारनंतर संतोष ठाकूर यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील ढोल घर तारा बारापाडा,बांधनवाडी,कल्ले बारापाडा मोहल्ला,आग्रीपाडा,आणि पेन तालुक्यातील खारपाडा, ठाकुरपाडा, दुष्मी वडमाळवाडी खैरासवाडी दुरशेत अशा २९ अंगणवाडयासह १० बालग्राम मित्रांना सर्व प्रथमोपचार साहित्याने भरलेल्या प्रथोमोपचार पेटयांचे वाटप केले.
कोरोना संसर्गच्या काळात लहान बालकांची जबाबदारी असलेली अंगणवाडी सेविकांना ह्या प्रथोमोपचार पेटयांचा जास्तीतीजास्त उपयोग होईल. त्यामुळे संस्थेच्या ह्या उपक्रमाबद्दल बालग्राम मित्रांनी समाधान व्यक्त केले आहे. संतोष ठाकूर हे मागील दहा वर्षांपासून आपल्या जन्मदिनी वृक्षारोपण व वृक्ष वाटप करत असतात. आत्तापर्यंत त्यांनी ८०० हुन अधिक झाडांची लागवड केली असून यामध्ये बहुतांश झाडे ही फळझाडे असल्याने ही झाडे आदिवासी बांधवांना त्यांच्या परसबागेत लावल्याने काही झाडांवर फळे येऊन त्याचा उपभोग येथील आदिवासी बांधव घेत आहेत. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड लावावे असे आवाहन ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना केले आहे.

संस्थेचे कार्यकर्ते उदय गावंड,राजेश रसाळ,सुनील विश्वकर्मा,तेजस चव्हाण, गोलू गुप्ता,सचिन गावंड,राजेश पाटील, जगदीश डंगर,जयेश म्हात्रे, स्मिता रसाळ,दीपिका पाटील,पांडुरंग गावंड यांच्यासह ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संतोष ठाकूर यांनी आभार व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.