Press "Enter" to skip to content

वाशिवली ठाकुरवाडीतील हातभट्टी उद्ध्वस्त : रसायनी पोलिसांची कामगिरी

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

डोंगर भागात गावठी हातभट्टीची दारू अड्डा चालवणारा मंगळ नारायण पारधी(वय48 रा वाशिवली ठाकुरवाडी) ला रसायनी पोलिसांनी अटक केली असून सुमारे 35हजार 570रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे.

मंगळ पारधी ठाकूरवाडीचे डोंगराळभागात गावठी हातभट्टीची तयार दारू तयार करून विक्री करत असल्याची माहिती रसायणी पोलिसांना खब-या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे रसायणी पोलीसांनी वाशिवली ठाकूरवाडी छापा टाकला असता गावठी दारू तयार करण्याचे साहीत्य व गावठी हातभट्टीची तयार दारू असा माल सापडला.

मंगळू पारधी विरोधात याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे दारूबंदी अधिनियम,1949, 65(ब) ,(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार प्रसाद पाटील करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.