Press "Enter" to skip to content

माथेरान घाटातील अपघातग्रस्त तरुणाचा अखेर मृत्यू

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

नेरळ माथेरान घाटातील एका अवघड वळणावर सहा ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात जबर जखमी झालेल्या तरुणाचा वाशी येथील इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ह्या दुर्दैवी घटनेमुळे माथेरानमध्ये सुरू असलेल्या कामांमध्ये आदिवासी कामगारांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आला आहे.

स्वतःच्या फायद्यासाठी मजुरांना मेंढरसारखे गाडी मध्ये कोंबून वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून सदर ठेकेदारांच्या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी येथील आदिवासी संघटना करीत असून अशा प्रकारचे अपघात भविष्यात टाळण्यासाठी शासन व पोलीस प्रशासनाने ह्या मजूर वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी येथे होत आहे.

माथेरान मध्ये सध्या मोठ्याप्रमाणात विविध ठिकाणी कामे सुरू आहेत त्याकरिता मजूर मिळत नसल्याने अनेक ठेकेदार माथेरान डोंगर परिसरातील आदिवासी बांधवांना माथेरान मध्ये मजुरी साठी आणत आहेत त्याकरिता ते लहान मोठ्या वाहनाचा उपयोग करताना दिसून येत आहेत असाच एक छोटा पिकअप टेम्पो मागच्या शुक्रवारी मजुरांना खचाखच भरून माथेरान कडे निघाला होता पण येथील जुमापट्टी वरील एक अवघड चढ वळणावर चालकाचा ताबा सुटून त्याचा अपघात झाला होता.

त्यामध्ये तीन किरकोळ तर बाळा ढोले (वय 25 वर्षे रा.भागूची वाडी कर्जत ) हा गंभीर जखमी झाला होता त्यास प्राथमिक उपचारासाठी कर्जत येथील रायगड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते पण छाती व डोक्याला मार लागल्याने पुढील उपचारासाठी त्याला वाशी येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले पण अखेर मंगलवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ह्या तरुणांच्या मृत्यूने त्याचा परिवाराचा मोठा आघात झाला असून त्याचे वयस्क माता पिता पत्नी व आठ महिन्याचे बाळ पोरखे झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.