रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिला आर्थिक मदतीचा हात : तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केला आर्थिक योगदानाचा धनादेश सुपूर्द
सिटी बेल | पनवेल |
पनवेल तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संघटना असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने आपली सामाजिक बांधिलकी जपत रायगड मधील पूरग्रस्तांना उभारणी देण्याच्या उद्देशाने आर्थिक योगदान दिले आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी पनवेलचे तहसीलदार यांच्याकडे मंचाच्या सदस्यांनी धनादेश सुपूर्द केला.
अध्यक्ष माधव पाटील, सल्लागार डॉक्टर संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीमध्ये पूरग्रस्त बांधवांना उभारणी देण्याचे कामी आर्थिक योगदान देण्याचे ठरविले. तमाम सदस्यांनी आपापले योगदान देत खारीचा वाटा उचलला. सदर योगदान राज्य आपत्ती नियोजन निधी मध्ये देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये महापुराने थैमान घातले होते ज्यामध्ये शेकडो संसार कोलमडून पडले, कित्येकांना हकनाक प्राण गमवावे लागले, तळीये सारखे तर संपूर्ण गाव उध्वस्त झाले आहे. प्राथमिक पातळी मध्ये आवश्यक ती मदत केल्यानंतर आता पूरग्रस्त बांधवांना आवश्यकता आहे भक्कम पुनर्वसन निधीची! याचे भान ठेवून पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने आर्थिक योगदान दिले आहे.
सचिव मंदार दोंदे यांच्यासह मंचाच्या सदस्यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला त्यावेळी त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष हरेश साठे, विवेक पाटील, संजय कदम, अविनाश कोळी,तृप्ती पालकर,राजू गाडे, प्रविण मोहोकर,अनिल कुरघोडे,अनिल भोळे, दिपक घोसाळकर,गौरव जहागीरदार,विकास म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.














Be First to Comment