Press "Enter" to skip to content

कोविड केअरची संकल्पना बदलणार !

आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड हॉस्पिटलची केली पाहणी

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

रायगड हॉस्पिटल मधील कोविड रुग्णालयाला आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा यांची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी सूचना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली.रायगड हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरचे कोविड रूग्णालयात रूपांतर होत असताना येथील सर्व सोयी सुविधा यांची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार थोरवे यांनी रायगड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या पाहणी करून माहिती घेतली आणि अधिकारी वर्ग तसेच रुग्णालय व्यवस्थापन यांच्यासोबत चर्चा केली. रायगड हॉस्पिटलला कोविड रुग्णालयाचा दर्जा द्यावी अशी मागणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे सातत्याने करीत आहेत.त्यात कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे असलेल्या कोविड केअर सेंटरचे कोविड रुग्णालयात रूपांतर करता येईल काय? याची माहिती रायगड हॉस्पिटलला भेट देऊन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली आहे. त्यानंतर संभाव्य कोविड हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे या पुढील आठवड्यात कर्जत येथे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज २५ जुलै रोजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटर तसेच हॉस्पिटल व्यवस्थापन यांचे खासगी कोविड हॉस्पिटलची पाहणी केली.त्यावेळी रायगड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ नंदकुमार तासगावकर, कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी के मोरे, यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप ठाकरे,युवासेनेचे कर्जत विधानसभा अध्यक्ष संदीप बडेकर,आदी प्रमुख आणि रायगड हॉस्पिटल व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीला आमदार थोरवे यांनी रायगड हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड रुग्णालयाची पाहणी केली. आमदार महेंद्र थोरवे यांनी शासन कोणत्याही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडून पैसे आकारत नाही आणि तसे नियम या ठिकाणी देखील पाळले जातील असे स्पष्ट केले.दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर बाबत अनेक चर्चा तालुक्यात सुरु आहेत.त्याचा आढावा देखील आमदार थोरवे यांनी यावेळी घेतला. त्यामुळे कोविड केअर ची संकल्पना यापुढे आपण बदलणार असून तालुक्यातील कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि कशेळे ग्रामीण रुग्णालय येथे कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांना विलगीकरण केले जाईल.त्यामुळे रायगड हॉस्पिटल मध्ये केवळ ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण यांना दाखल करून बरे केले जाईल आणि त्यासाठी रायगड हॉस्पिटल प्रशासनाने शासनाकडून त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे,याची यादी करावी.संबंधित यादी ही पालकमंत्री कर्जत येथे येण्याआधी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावी असे आमदार थोरवे यांनी सूचित केले.रायगड हॉस्पिटल मधील संभाव्य कोविड हॉस्पिटलबाबत निर्णय घेण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे येणार आहेत.त्यापूर्वी रायगड जिल्हाधिकारी यांनी कोविड रूग्णालय साठी आवश्यक बाबींवर सकारात्मक कारवाई करावी अशी अपेक्षा शेवटी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.