सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कोविशील्ड लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. कर्जत तालुका आदिवासी बहुल तालुका असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक लोकांकडे मोबाईल नाहीत आणि नेटवर्क च्या बाबतीत सर्वत्र बोंबाबोंब आहे.ज्यांना स्वतःचे नाव लिहिता येत नाही किंवा सहीच्या जागेवर अंगठा चिकटवावा लागतो त्यांच्या कडून लसीकरणा साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची अपेक्षा करणे म्हणजे जावई शोधच म्हणावा लागेल. यावर शासनाने काहीतरी मार्ग काढावा. अशी मागणी या परिसरातून होत आहे.
कर्जतच्या आदिवासी भागात एकमेव असलेल्या कशेळे ग्रामीण रुग्णालयात आजूबाजूच्या पन्नास गावातील अशिक्षित आदिवासी रोज येऊन लस मिळण्याची वाट रुग्णालयात येऊन बघत असतात. काही दिवस फेऱ्या मारून लस मिळत नाही तेव्हा ते लस घेण्याचा नाद सोडून देतात. त्यामुळे ग्रामीण भाग कधीच कोरोना मुक्त होऊ शकणार नाही.
आज लसीचे कीती डोस येणार आहेत? हे येथील दवाखान्यात पोहचे पर्यंत खुद्द डॉक्टरांना सुद्धा माहीत नसते परंतु बाहेरील लोकांना त्याची माहिती आधीच होते. ते सुशिक्षित असल्याने नोंदणी करून आरामात येऊन डोस घेऊन जातात आणि येथील स्थानिक आदिवासी मात्र आशाळभूत नजरेने त्यांना पाहत राहतात. हे असेच चालू राहिले तर स्थानिकांना किमान वर्षभर तरी लस मिळणे शक्य नाही. याबाबत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत पुढाकार घेऊन स्थानिकांना प्रथम लस मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा आम्हला येथील केंद्रावर येऊन नाईलाजाने बाहेरून आलेल्या लोकांना पिटाळून लावावे लागेल. असे येथील सामाजिक कार्यकर्ते उदय पुंडलिक पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment