Press "Enter" to skip to content

एनजीओ फेडरेशनच्या जिल्हा समन्वयकपदी मनोज गावंड यांची निवड 

सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)

महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक मनोज गावंड यांची स्टेट एनजीओ फेडरेशनच्या रायगड जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे . गावंड यांनी गेल्या वीस वर्षापासून प्रतिबंधासाठी अनेक प्रकल्पामधून राज्य स्तरावर काम करीत आहेत . तसेच पाणलोट विकास, स्वच्छ भारत मिशन, भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा , मेरीटाईम बोर्ड स्वच्छ बीच मिशन , आदर्श गाव योजना , बचत गट उपजिविका  प्रशिक्षण,  ग्रामपंचायत पाणलोट कमिट्या क्षमता बांधणी प्रशिक्षण , जलयुक्त शिवार प्रशिक्षण , JSW घर बनावो योजना इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हा व राज्यस्तरावर सामाजिक कामे यशस्वीपणे पार पाडत श्री गावंड यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र स्टेट एनजीओ फ़ेडरेशनने त्यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे त्यांच्या निवडी बरोबर पदाची धुरा देताना स्टेट फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पवार व सचिव बाळासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले असून सामाजिक कार्यकर्ते , मित्र परिवार व आप्तेष्ट यांचेकडून श्री. गावंड यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.