सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू )
आज नागपंचमीच्या दिवशी उरणमध्ये २६ जण पॉझिटीव्ह सापडले तर १५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. एकूण पॉझिटीव्ह ७५७, बरे झालेले ५६२, उपचार घेणारे १७३ तर मयत २२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
करंजा सुष्मा विहार १, करंजा तांडेल वाडी १, करंजा नवापाडा १, बोरी १, सोनारी १, रांजणपाडा १, मोरा कोळीवाडा १, नवीन शेवा १, फुंडे १, कोटनाका १, उरण ग्रॅड व्हीला १, जेएनपीटी टाऊनशिप २, द्रोणागिरी २, सारडे १, चिरनेर १, केगाव १, दादरपाडा १, विंधणे १, मजिद मोहल्ला १, सावरखार १, दिघोडे १, कुंभारवाडा १, नवघर २ असे एकूण २६ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर करळ १, दिघोडे १, चिरनेर १, खोपटे २, धाकटी जुई १, आवरे १, द्रोणागिरी १, बोकडविरा १, उरण मनिभद्र अपार्टमेंट १, जासई २, कोटनाका १, उरण वाणी आळी १, उरण चॉईस आंबेदीप बिल्डिंग १ असे एकूण १५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढतच चालला आहे. आज तर बाजारपेठ उघडल्यानंतर गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. ही गर्दी बघूनच काहीजण मुकाट्याने खरेदी न करता घरी गेले. यावरून जनतेला दररोज कोरोना पॉझिटीव्ह सापडूनही त्याची भीती वाटत नसल्याचे दिसून येते.






Be First to Comment