सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळील कुहिरे (ता. पेण) येथील विनय दिपक रेवाळे हा २१ वर्षीय तरुण कुहिरे येथील आपल्या घरातून सोमवार दि. ९ आॅगस्ट रोजी सकाळी कुणालाही काही एक न सांगता घरातून निघून गेला आहे. दिवसभर त्याचा शोध नातेवाईक व इतर सर्वत्र घेऊनही विनय याचा तपास न लागल्याने तो हरविल्याची तक्रार त्याचे वडिल दिपक रेवाळे यांच्याकडून नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
या तरुणाची उंची ५ फूट ३ इंच, रंग गोरा, अंगाने मजबूत, उभट चेहरा, सरळ नाक, बारीक मिशी, कपाळावर लाल टिळा, अंगावर लाल रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची पँट असे त्याचे वर्णन असून या तरुणास अधून मधून आकडी येण्याची सवय आहे.
याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात तरुण हरविल्याची नोंद करण्यात आली असुन नागोठण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नितीन गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.








Be First to Comment