Press "Enter" to skip to content

वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या रोमी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डींगचा पर्दाफाश

वेश्याव्यवसाय करणा-या ७ महिलांना घेतले ताब्यात : दोघा लाॅज चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

सिटी बेल | पनवेल‌ | वार्ताहर |

तालुक्यातील पनवेल – मुंब्रा मार्गावर रोहिंजण टोल नाक्याजवळ असलेल्या रोमी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डींगवर अ.मा.वा.प्र. कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून ७ महिलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमार गौडा (52), तमन्ना गौडा (52) हे चालवित असलेल्या रोमी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डींग रोहिंजण टोल नाक्याजवळ लॉजमध्ये काही महिलांना वेश्या व्यवसायासाठी ठेवण्यात येत असून त्यांचा वापर वेश्या व्यवसायासाठी करण्यात येत असल्याची खबर अ.मा.वा.प्र.कक्ष गुन्हे शाखेचे वपोनि सोनावणे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून त्यानुसार त्यांची खात्री पटल्यावर विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून ७ महिलांसह गौडा यांना ताब्यात घेतले आहे. व त्या ठिकाणाहून रोख रक्कम व इतर वस्तू असा मिळून २ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.