Press "Enter" to skip to content

खालापूरात माजगावच्या सरपंच आणि पत्नीला मारहाण

यु ट्यूबवर टाकलेल्या बातमीतुन वाद विकोपाला

सिटी बेल लाइव्ह / खालापूर / मनोज कळमकर #

माजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोपीनाथ कृष्णा जाधव ( वय 52,रा.आंबिवली माजगाव) आणि त्यांची पत्नी मनिषा हिला राजकिय वादातून मारहाण करण्याची घटना घङली असून  मारहाण करणा-या भगवान राघो जाधव(रा.लोहप,खालापूर)अरूण गोविंद जाधव,ज्ञानेश्वर दत्ताञय जाधव व रमेश 
भाऊराव जाधव(सर्व रा.आंबिवली) विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

माजगाव ग्रामपंचायतीवर गोपीनाथ जाधव थेट सरपंच म्हणून निवङूण आले आहेत.गेल्या काहि महिन्यापासून उपसरपंचपदावरून वाद सुरू असून प्रकरण पंचायत समिती आणि पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते.उपसरपंचपदाच्या निवङणूकिला तहसीलदारानी स्थगिती दिली होती. निवङणूक स्थगिती आणि सरपंच गोपीनाथ जाधव यांचेवर गुन्हा दाखल करण्याची बातमी स्थानिक युट्यूबवर प्रसारित झाल्यानंतर वरील चौघानी जाणीवपूर्वक ती बातमी गोपीनाथ जाधव यांचे समोर लावून त्याना ङिवचण्यास सुरवात केली.त्यामुळे प्रकरण तापून  भगवान ,अरूण,ज्ञानेश्वर व रमेश यानी सरपंच गोपीनाथ यांना  लाथाने व हाताबुक्यानी मारहाण करून शिविगाळी दमदाटी केली.हा प्रकार गोपीनाथ यांची पत्नी मनिषा हिने पाहिल्यानंतर  त्या सोडवण्याकरीता मध्ये आल्या असता भगवान जाधव याने मनिषा यांच्या उजव्या हातावर  काठीने मारहाण केली.मनिषा  खाली पडल्या असता त्याना लाथांनी मारहाण केली.या मारहाणीत मनिषा यांच्या गळयातील सोन्याचे सर तुटुन पडुन गहाळ  झाले आहे.तसेच गोपीनाथ जाधव देखील जखमी झाले.

 याबाबत गोपीनाथ जाधव यानी खालापूर पोलीस ठाणे येथे चौघांविरोधात तक्रार दिली असून पोलीसानी  भा.दं.वि.कलम 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  अधिक तपास पोलीस नाईक अमित सावंत हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.