Press "Enter" to skip to content

रोह्यात उद्या आरोग्य तपासणी केंद्राचे उदघाटन

सिटी बेल लाइव्ह / खाब-रोहा (नंदकुमार मरवडे )


सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी स्थानिक प्रशासन अथक परिश्रम घेत आहे.असे असताना कोरोना बाबतीत लोकांच्या मनात गैरसमज, प्रचंड भीती आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. कोंकणी डॉकटर असोसिएशनच्या सहकार्याने रोहा अष्टमी मुस्लिम समाज बांधवांच्या प्रयत्नाने लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी व ताप, खोकला, सर्दी या सारख्या रोगांवर वेळीच उपचार करण्यासाठी तज्ञ डॉकटरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी केंद्र सुरू होत आहे. या आरोग्य केंद्राचे उदघाटन कोकणी डॉकटर असो. चे अध्यक्ष डॉ. वसीम फोफलुनकर यांच्या प्रमुख उपस्थिती होत आहे.
उद्या रविवार दि.२६ जुलै रोजी सकाळी ९ वा. या आरोग्य तपासणी केंद्राचे उदघाटन रोहा धावीर रोड मार्गावरील रोहा एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या इंग्रजी माध्यमिक शाळेत सदर संपन्न होणार आहे. दर रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. पर्यंत रुग्णांवर तज्ञ डॉकटर उपचार करणार आहेत.लोक वर्गणीतून सदर केंद्र सुरू करण्यात आले आहे. डॉ. फरीद चिमावकर,डॉ.नदीम नाडकर,डॉ. सौ. तसबीना कासकर,डॉ. सीमाब पलवकर ,कु. तनझील बोधले आधी जण रुग्णांवर उपचार व योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. या तपासणी केंद्रच्या माध्यमातून लोकांना खुप आधार मिळणार असून मनातील भीती देखील दूर होणार असल्याची माहिती रोहे अष्टमीकर बांधवांनी दिली आहे.
रोहा शहर विशेषतः मोहल्ला विभागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लोकांच्या मनात प्रचंड भीती आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्शवभूमीवर रोहा अष्टमी येथील मुस्लिम समाज बांधवांनी संघटीत होऊन ‘मिशन झिरो’ ही मोहीम हाती हाती घेतली आहे. व मोहल्ला परिसर समवेत संपूर्ण रोहा अष्टमी शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.