
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक : व्यंकय्या नायडूंना निषेधाची पत्र
सिटी बेल लाइव्ह / खोपोली प्रतिनिधी ( संतोषी म्हात्रे )
भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीच्या वेळी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा देण्यास आक्षेप घेतल्याने शिवप्रेमी आक्रमक झाले असून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने नायडू यांना २० लाख पत्र पाठवून निषेध नोंदवण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे खोपोलीत युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्या नेतृत्वाखाली नायडूंना पत्र पाठवली.
खोपोलीत युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्या नेतृत्वाखाली नायडूंना असंख्य पत्र पाठवली यावेळी जिल्हायुवक अध्यक्ष अंकित साखरे, जिल्हा परिषदेचे सदस्य नरेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, युवक उपाध्यक्ष भूषण पाटील, तालुका युवक अध्यक्ष कुमार दिसले,भगवान पाटील, संदेश चौधरी,प्रकाश यादव,तालुका युवक सरचिटणीस नरेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिली होती. त्यावर आक्षेप घेत राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना समज दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली जात आहेे.






Be First to Comment