
गणेशभक्तांचा प्रवास सुकर होण्यासाठी खा.सुनील तटकरेंनी पेण येथे केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे )
दरवर्षी गणेशउत्सवा करिता देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो चाकरमानी कोकणात येतात. गणेशउत्सवा करीता कोकणात येणाऱ्या भाविकांकरिता मुंबई गोवा मार्गावरील प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी महामार्गावरील पडलेले खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी दिले. त्याचप्रमाणे गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग अद्ययावत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी खा.सुनील तटकरे, नॅशनल हायवेचे मुख्यअभियंता प्रशांत फेंगडे, जे.एम. म्हात्रे इन्फ्राटेक्चरचे मॅनेजर धीरज पाटील, राष्ट्रवादीचे दयानंद भगत,उदय जवके, नरेंद्र ठाकूर, राजिप सदस्य डी बी पाटील, प्रभाकर म्हात्रे,खारपाडा सरपंच रश्मी भगत,जितेंद्र ठाकुर यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. तटकरे यांनी जिते, चूनाभट्टी, तरणाखोप, पेण, वाशीनाका, डोलवी, काराव, गडब, निगडे येथील रस्त्या संदर्भातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्याकरिता अधिकाऱ्यांना आदेश दिले.
खारपाडा पूर्व पश्चिम सर्व्हिस रस्ता, महामार्गावरील पाणी जाण्याकरता नवीन गटारे बांधणे, रस्ता डांबरीकरण करणे, खारपाडा गाव ते भगत नगर येथील पूर्व पश्चिम गटारे खारपाड बस स्टॉप निवारा शेड यासह इतर कामे तातडीने मार्गी लावण्यासाच्या सूचना दिल्या.






Be First to Comment