Press "Enter" to skip to content

उरणमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

२ तरुणांवर पोस्कोचा गुन्हा दाखल ; नराधम आरोपींना अटक

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरणमधील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी जयेश पाटील व मनीष देवरे यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला मार्च ते मे २०२१ या दरम्यान आरोपी जयेश पाटील याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करीन असे आमिष दाखवित नागाव येथील एका रूमवर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तर मनीष देवरे याने एप्रिलमध्ये इन्स्टाग्रामवर मैत्री करीत भेटावयास बोलावून नवीन शेवा येथील एका पडक्या इमारतीमध्ये नेऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून जबरदस्तीने शरीर संबंध केले. या शरीर सबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला आहे.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल होताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जयेश पाटील व मनीष देवरे याना अटक करून पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२१भादवी कलम ३७६, ३७६(२) (एन) महाराष्ट्र बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ४,५ (जे) (२) (एल) सहवाचन कलम ६, कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि प्रकाश पवार यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास मसपोनी वृषाली पवार या करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.