पुरे झाल्या अर्ज आणि विनंत्या आता आर पार ची लढाई
संतोष ठाकूर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.
ग्रुप ग्राम पंचायत आपटे हद्दीतील कोरळवडी आदिवासी वाडी आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे.पायाभूत सुविधांना मुकलेल्या या आदिवासी वाडीच्या विनंती, अर्ज करण्याचा संयम तुटल्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी नऊ ऑगस्ट रोजी पनवेल उपविभागीय कार्यालयाच्या बाहेर बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक माहिती देताना संतोष ठाकूर म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांना हरताळ असल्यामुळे येथील ग्रामस्थांसह उपोषण करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक नाही. या आदिवासी वाडीतील नागरिकांना तीन किलोमीटर जंगलात पायपीट करावी लागते. सर्पदंश आणि हिंस्त्र श्र्वापदांच्या हल्ल्याची भीती असल्याने पालक मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत.रात्री अपरात्री कुणी आजारी असल्यास झोळीत टाकून पायपीट करावी लागते.पावसाळ्यात तर दिवसेंदिवस वाडीचा संपर्क तुटतो.
2015 पासून या रस्त्याच्या साठी ग्रामस्थ आक्रमक पणे मागणी करत आहेत.11 जानेवारी रोजी पनवेल तहसीलदारांना रस्ता झाला नाही तर मोर्चा काढू असा इशारा दिला असता, 20 जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयातून रस्ता बांधण्याचे आश्वासन देण्यात आले. या रस्त्याच्या बांधणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधान सभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. इतके संविधानिक प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आदिवासी बांधवांची ससेहोलपट होत असेल तर अमारण उपोषणाशिवय पर्याय नाही असे संतोष ठाकूर म्हणाले.
या उपोषणास युवासेना केळवने जिल्हा परिषद अधिकारी स्वप्नील भोवड , ग्रामपंचायत सदस्य वृषभ धुमाळ , युवासेना केळवने विभाग व शिवसेना शाखा आपटा यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.










Be First to Comment