Press "Enter" to skip to content

खळबळजनक : सोन्याच्या दुकानातील कर्मचार्‍याला जबरी मारहाण करून लुटले

60 ते 70 लाखाचा सोन्याचा ऐवज लुटल्याचा अंदाज

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या सोन्याचे पॉलिश करणार्‍या दुकानातील एका इसमाला त्याच्या ताब्यातील सोने खाली घेवून येत असताना दोन अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात अवजड वस्तूने मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची बॅग काढून घेवून ते मोटार सायकलवरुन पसार झाल्याची घटना घडली आहे. सदर बॅगेमध्ये साधारणतः 1200 ग्रॅम सोने ज्याची अंदाजे किंमत 60 ते 70 लाख एवढी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर रावसाहेब कोळेकर यांचे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश देण्याचे दुकान असून त्या ठिकाणी काम करणारा कर्मचारी दिपेश जैन हा दुकानातील सोने घेवून बॅगेत भरुन खाली उतर असताना दोन अज्ञात इसमांनी त्याला जिन्यामध्येच गाठून त्याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारुन त्याच्या हातात असलेली सोन्याची पिशवी त्यामध्ये साधारणतः 1200 ग्रॅम सोने असण्याची शक्यता आहे खेचून काढून घेवून ते मोटार सायकलवरुन पसार झाले.

यावेळी दिपेश जैन याने तो रक्ताच्या थारोळ्यात असतानाही पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते गल्लीतून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, वपोनि अजयकुमार लांडगे, वपोनि बी.एन.कोल्हटकर, वपोनि गिरीधर गोरे, वपोनि रवींद्र दौंडकर यांच्यासह विविध पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.

जखमी दिपेश जैन

त्या भागातील विविध दुकानात असलेल्या सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून जखमी दिपेश जैन याला शहरातील पटेल रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीयुक्त वातावरण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.