Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात अजूनही २८ सक्रीय कोरोना रुग्ण

नागरिकांनी गाफिल राहिल्यास मोठा धोका

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली.तशीच दुसऱ्या लाटेतही दिसून आली.परंतू सध्या आठवडाभराची परिस्थिती पाहिल्यास पुन्हा कोरोनारुग्ण संख्या वाढू पहात आहे.मोहोपाडा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख जूलै सुरवातीला खालावला होता.परंतु महिना आठवडाअखेर पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत उसली घेतल्याने रसायनी परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सध्या वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद
विभागात ३१ जुलैपर्यंत दहा दिवसांच्या कालावधीत एकूण २८ रुग्ण सक्रिय असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६०५ झाली आहे.यात कोरोनावर १५१३ जणांनी मात केली आहे.तर वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील एकूण ६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन शासनाच्यावतीने होत आहे.

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची ३१ जुलैपर्यंत असलेली गावनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे

मोहोपाडा — कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-०२
रिस परिसर – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या -०८
नविन पोसरी – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-०१
चांभार्लीं – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या -०२
शिवनगर – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-०२
आली आंबिवली – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-०१
लोधिवली परिसर – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-०३
पानशिल – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-०
तळेगाव – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-०
रिसवाडी – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या ०
तळेगाव वाडी – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या ०
पराडे – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या ०
खाने आंबिवली – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या ०८
भटवाडी/कालणवाडी – कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या ००
कांबे – ०१

दरम्यान खालापूर तालुका क्यातील ९२४२ रुग्ण संख्या आहे.तर ३१ जूलैपर्यंत चौक मंडलात एकूण २६५२ रुग्ण संख्या असून एकूण ९१ जण मयत झाले आहेत.तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ८ लाख ४९ हजारांच्या आसपास नागरिकांनी लस घेतली आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरण सुरु केले असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत,सोशल डिस्टिंक्शन पालावे,मास्कचा वापर करावा असे आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.