सिटी बेल| पनवेल | वार्ताहर |
थकीत विज बिल न भरल्याने घराची लाईट कट केल्याने खारघर येथे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
महावितरणचे खारघर येथील प्रधान तंत्रज्ञान कृष्णाकांत छबु गायकवाड आणि कर्मचारी विजय पाटील व निळकंठ पवार हे सेक्टर 12, खारघर येथे संतोश मोहीते यांचे घरी थकीत विज बील वसुली करीता गेले असता संतोश मोहीते यांनी कृष्णाकांत छबु गायकवाड व त्यांच्या सोबत असणारे विजय पाटील व निळकंठ पवार यांचेषी हुज्जत घातली आणि बलप्रयोग करुन करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ व धमकी दिली म्हणुन संतोश मोहीते त्यांचेविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








Be First to Comment