सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड ( विश्वास निकम) :
ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे कार्यकारी सदस्य कु. मनोहर अरविंद साळवी रा. हेदवली यांची महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित मध्ये उपकेंद्र सहाय्यक पदी नुकतीच निवड झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने राज्यात दोन हजार जागांची नोकर भरती काढली होती यासाठी त्यांनी २५ ऑगस्ट २०१९ रोजी स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती या परीक्षेसाठी राज्यातून जवळपास पन्नास हजाराच्यावर विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल २९ जून २०२०रोजी लागला असता कु मनोहर साळवी हे पास होऊन त्यांची महावितरण मध्ये उपकेंद्र सहायक पदी निवड झालेली आहे. मनोहर साळवी यांचे जीवन चरित्र पाहिले असता ते गरीब शेतकरी कुटुंबातून परिश्रमाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे आलेले विद्यार्थी आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण राजीप शाळा ऐनघर हेदवली, माध्यमिक शिक्षण गीता तटकरे ऐनघर कानसई तसेच १२ वी पर्यंत चे शिक्षण नागोठणे येथे आणि आय.टि.आय.चे प्रशिक्षण नागोठणे येथे झालेले आहे. अशा संघर्षात्मक जीवन चारित्रावरून ग्रामीण भागातील तरुणांनी मनोहर साळवी यांचा आज आदर्श घेणे गरजेचे आहे . साळवी यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेने भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून ऐनघर हद्दीतील सर्व गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.






Be First to Comment