
सिटी बेल लाइव्ह / श्रीनिवास काजरेकर/ नवीन पनवेल #
श्रावणमासातील पहिलाच सण असलेल्या नागपंचमीच्या दिवशी पनवेल परिसरातील भाविकानी आपल्या घरी कुलाचाराप्रमाणे नागोबाचे पूजन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या व्रतामधे सणाचा किंवा सोहळ्याचा उत्साह नसला तरी आपला कुलाचार किंवा परंपरा म्हणून या भाविकानी घरामधे नागपूजन केले. कालच्या दिवसात तसेच आज सकाळीही नागोबाची मूर्ती, पूजासाहित्य व फुलसाहित्य इत्यादींच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झालेली दिसून आली.
यंदा कोरोनामुळे पूजन, नैवेद्यअर्पण वगैरे कार्यक्रम घरगुती स्वरूपातच संपन्न झाले. दुपारनंतर उद्याने तसेच सोसायटींच्या आवारात किंवा गच्चीवर होणारे महिलांच्या झिम्माफुगड्यांचे कार्यक्रम इत्यादी रद्द करण्यात आल्याने महिलावर्गाची नाराजी पहायला मिळाली.
आनंदावर विरजण
"दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी दुपारनंतर फुगड्या, नाचगाणी यांचा आनंद आम्ही सर्व महिला एकत्र येवून येतो. यंदा कोरोनामुळे आमच्या या आनंदावर विरजण पडले आहे. पण समाजस्वास्थ्याचे भान राखून महिलानी फुगड्यांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. आमच्या आनंदापेक्षा आरोग्यरक्षण महत्वाचे आहे."
मृणाल इनामदार, नवीन पनवेल






Be First to Comment