Press "Enter" to skip to content

रसायनी मध्ये खळबळ : पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्त्या

६७ वर्षाच्या पतीने ६० वर्षाच्या पत्नीचा गळा आवळून केला खुन नंतर स्वतः घेतला गळफास

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

साठ वर्षे पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून पतीने खून केल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पतीने देखील गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार रसायनी पोलीस ठाणे हद्दीत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास. सुमारास चांवढोळी गावाच्या हद्दीत राहणारे राम वामन चितळे (वय67) यांनी घरात नातेवाईक नसताना कोणत्यातरी अज्ञात कारणावरून पत्नी जयश्री (वय60) हीचा दोरीच्या सहायाने गळा आवळून तीला जीवे ठार मारले. नंतर मुख्य घराचा लॅचचा दरवाजा बंद करून दुस-या खोलीत जावून लाकडी भालाला दोरी व कापडी चिंधीच्या सहायाने गळफास घेवून राम यांनी आत्महत्या केली.या घटनेची माहिती चितळे यांची मुलगी रंजिता चव्हाण हिने पोलीसांना दिली आहे.

याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे ह्या करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.