Press "Enter" to skip to content

खालापूरात दोन बेवारस मृत्यू ; नातेवाईकांचा शोध सुरू

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत मृत्यू पावलेल्या दोन इसमाच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत. पहिल्या घटनेत तालुक्यातील चौक पोलीस दूर क्षेत्र हद्दीत जुन्या मुंबई पूणे हायवे जवळ आंब्याच्या झाडाखाली एक पंचावन्न वर्षीय अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आला. रंगाने गोरा , अंगाने सडपातळ, निळ्या रंगाची पॅन्ट, दाढी वाढलेली अशा इसमाबाबत काही माहिती असल्यास खालापूर पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरा बेवारस इसमाचा, खोपोली पोलीस ठाणे हद्दीत अपघात घडला होता. शिवप्रसाद यादव असे नाव समजले असून अंदाजे बेचाळीस वय, अंगाने सडपातळ, छातीवर तीळ आणि रंगाने सावळा असलेल्या शिवप्रसाद चा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांचा काही च तपास लागला नसून सदर वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.