सिटी बेल लाइव्ह | अलिबाग | राजेश बाष्टे|
कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, हे सर्व पूर्व पदावर आणण्यासाठी सीएफटीआय ट्रस्टच्या मार्फत गरजूंना वेळोवेळी मदत केली जात आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सेवाभावी संस्थेमार्फत ५०००० लोकांना पौष्टिक खिचडी वाटपाचा संकल्प सीएफटीआय ट्रस्टच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या मार्फत करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ७ जुलै पासून आज पर्यंत जवळपास २०,००० नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. यामध्ये रोहा, पेण, झिराड, कुरुळ, चेंढरे, मेटपाडा, कुरकुंडी, वायशेत, भाल, रेवदंडा, चौल, मापगाव, सहाण, म्हात्रोली आणि इतर गावांत वाटप करण्यात आले.
हा सेवाभावी उपक्रम पुढील एक महीना सुरू असणार आहे, सीएफटीआय ट्रस्टच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या सभोवतालच्या परिसरातही खिचडीचे वाटप करायचे असल्यास अमित देशपांडे ९६७३७६६३४७ प्रितेश पाटील 8380055676 यांना संपर्क करावा असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.









Be First to Comment