नागोठणे कोव्हीड केयर सेंटरमध्ये मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा…!

रिलायन्स नागोठणे कंपनीचे सहकार्य
सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे यांच्या वतीने भारतीय एज्युकेशन संकुल, नागोठणे येथे बनवलेल्या कोव्हीड केयर सेंटर चा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता.25) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन संपन्न झाला. या कोव्हीड केयर सेंटरमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा व व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागोठणे विभागातील जनतेला कोव्हिडं 19 संबंधित उपचार घेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता, मात्र आपल्या परिसरातच कोव्हिडं वर उपचार मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रिलायन्स प्लॅन्ट व टाऊनशीप नजीकच्या गावातील नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सदरची व्यवस्था सुरू करण्यात येत आहे. शासकीय आरोग्य विभागातर्फे प्रमाणित कोरोना बाधित रुग्ण येथे योग्य प्रकारे उपचार घेऊ शकतील. याकामी सहकार्याची भूमिका बजावल्या बद्दल रिलायन्स नागोठणे उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे व शिवसेना नेते किशोरशेठ जैन यांचे जनमानसातुन आभार मानले जात आहेत.






Be First to Comment