Press "Enter" to skip to content

वाहनाची मोटार सायकलला धडक ; मोटारसायकल स्वार ठार, 1 जखमी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

भरधाव वेगात घेवून चाललेल्या वाहनावरील चालकाने त्याच्यापुढे चाललेल्या मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण खाली पडून त्यातील एक जण गंभीररित्या जखमी होवून मयत पावला आहे. तर दुसरा सहकारी जखमी झाल्याची घटना गव्हाण फाटा चौक पोलीस चौकीसमोर घडली आहे.

दत्तात्रेय कोडग (38) हा त्याच्या ताब्यातील वाहन घेवून गव्हाण फाटा चौक येथून जात असताना त्याने पुढे चाललेल्या मोटार सायकलला पाठीमागून धडक देवून त्यात मोटार सायकलवरील योगेश जानकर (24) व त्याचा सहकारी समाधान दोलताडे (27) हे दोघे खाली पडले. यात योगेश यास किरकोळ दुखापत तर त्याचा मित्र समाधान याला गंभीररित्या जखमी झाल्याने तो त्यात मयत झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.