Press "Enter" to skip to content

धक्कादायक : मोबाईल चोराने तिघांवर केला चाकुने हल्ला

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

सचिन चव्हाण (18) हा त्याच्या दोन मित्रांसह पनवेलवरुन देवद गावाकडे जात असताना पनवेल रेल्वे स्टेशन मालधक्का पटरीजवळ चार आरोपींनी सचिन चव्हाण व त्याच्या मित्रावर हल्ला करून त्यांच्याकडील मोबाईल फोन जबरीने खेचण्याचा प्रयत्न केला.

त्यास त्यांनी विरोध केल्याने त्या तिघांनी त्यांच्या हातातील चाकूने मारुन सचिन चव्हाणसह सिद्धोधन पाईकराव, अनिकेत साळवी या तिघांना जखमी केले आहे. याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अशाप्रकारे पनवेल शहरात चोरी आणि लुटमारीचे प्रकार वाढले असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.