सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
कोरोना संसर्गामध्ये कोरोनाची लागण झालेय की, नाही हे समजण्यासाठी असणाऱ्या चाचण्यांपैकी महत्वाची चाचणी समजली जाणारी आरटीपीसीआर चाचणी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या सर्व उपकेंद्रातील गावांतील नागरिकांनी या चाचणीचा लाभ घ्यावा असे आवाहन नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रुती मोरे व डाॅ. अमृता म्हस्के यांनी केले आहे.
कोराना संसर्ग झाला आहे की, नाही हे पाहण्यासाठी रॅपिड अँटिजन व आरटीपीसीआर या चाचण्या करण्यात येतात. यापैकी खात्रीलायक परिणामांसाठी करण्यात येणारी आरटीपीसीआर चाचणी साठी खासगी प्रयोग शाळांमध्ये गेलेल्या नागरिकांना ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत होते व आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वी केवळ रॅपिड अँटिजन हीच चाचणी उपलब्ध होती.
आता आरटीपीसीआर चाचणीही मोफत उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोफत कोविड-१९ तपासणी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवालही दुस-या वा तिसऱ्या दिवशी मिळणार असल्याने कोरोना संशयास्पद असलेल्या नागरिकांनी त्वरीत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.








Be First to Comment