कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने विविध जातींच्या आठ हजार आरोग्यदायी वृक्षांची लागवड
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
चौक वावर्ले येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपक गणपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र क्रांती सेनेचे पक्षप्रमुख सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वावर्ले रायगड,उस्माणाबाद,लातूर आदी जिल्ह्यांत पाच हजार वृक्ष वाटप तर तीन हजार वृक्षलागवड करण्यात आली.यावेळी एकूण
आठ हजार आरोग्यदायी विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आल्याने भविष्यात या वृक्षांचा नागरिकांना फायदा होईल असे कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक पाटील यांनी सांगितले.
दरम्यान वावर्ले येथील मालरानावर वृक्षलागवड करुन आदीवासी बांधवांना वृक्षवाटप करण्यात आले.यावेली कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपक गणपत पाटील, खजिनदार रामदास पाटील,रुपाली बांडे,सुमिता पाटील, भावना पाटील,विजय आहेर,भिका भला,बालू भला,परशा ठाकूर, दत्ता वाघमारे आदी उपस्थित होते.








Be First to Comment