सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या गावचे पोलिस पाटील खेळू मरवडे यांचे जेष्ठ सुपुत्र अमित मरवडे (३० वर्ष ) याच्या दि.२३ जुलै रोजी झालेल्या अपघाती म्रुत्यूमुळे समस्त मरवडे परिवारासह तळवली गावावर दु:खाचे सावट पसरले असून संपूर्ण तालुक्यात त्याच्या या दु:खद निधनाने हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
गत वर्षीच ऐन तारुण्यातून विवाहबद्ध झालेला अमित शरीरयष्टीने मजबूत,निर्वव्यसनी,सर्वांशी प्रेमाने वागणारा व शांत स्वभावाचा तसेच लहान थोरांचा आदर करणारा होता.आपले शालेय शिक्षणानंतर एम.बी.ए.करून मणिपूर गोल्ड नेरूळ ब्राँच येथे गेली पाच वर्षापासून तो जाँब करीत होता.तर पनवेल येथे आपल्या पत्नीबरोबर वास्तव्यास होता.गुरूवार दि.२३ जुलै रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे आपली ड्युटी पुर्ण करून बाईकवरून आपल्या रूमवर परतत असताना त्याच्या बाईकला एका वाहनाची धडक बसल्याने त्याचा अपघात घडला व त्या अपघातात अखेर अमितने या जगाचा निरोप घेतला.
अमितच्या या अपघाती निधनाचे व्रुत्त समजतात संपूर्ण तळवली गावामध्ये सन्नाटा पसरला होता.तर संपूर्ण परिवारासह ग्रामस्थांना देखील अश्रू अनावर झाले होते.अखेर ता.२४ रोजी पहाटे मोठ्या शोकाकुल वातावरणात व जड अंत:करणाने अमितचे अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत उरकण्यात आले.त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक भाऊ,दोन बहिणी,चुलते,चुलतभाऊ व बहिणी असा मोठा परिवार असून त्याचे दशक्रियाविधी शनि. दि.१ आँगस्ट रोजी तर अंतिम धार्मिकविधी मंगळ. दि.४ आँगस्ट रोजी तळवली तर्फे अष्टमी निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.






Be First to Comment