सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत /सुभाष सोनावणे #
श्रीराम मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का ? असे विधान नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी केले होते , त्यामुळे श्रीरामचंद्राच्या भक्तांमध्ये व भाजपमध्ये भावना दुखावल्याने नाराजी पसरली होती . श्रीराम नावाची महंती व इतिहास विसरलेले राष्ट्रवादीचे शरद पवार यांना जाणीव करून देण्याच्या हेतूने भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रान्त पाटील यांनी राज्यातून शरद पवार यांना पोष्टाने ” जय श्रीराम ” लिहलेले पत्र पाठविण्याचे आदेश दिले होते , त्यानुसार आज कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानाचा विरोध करून त्यांना ” जय श्रीराम ” लिहून पत्र पाठविण्यात आली .
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्याचा भूमीपूजनाचा कार्यक्रम ५ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे . त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सध्या देशात कोरोना विषाणू महामारीचा काळ असल्याने राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार आहे का , असे वक्तव्य केले होते , त्यामुळे श्रीराम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या , त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यपदाची शपथ घेताना ” जय शिवाजी , जय भवानी , जय महाराष्ट्र ” , अशी घोषणा दिली होती . यांस राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अध्यक्ष नायडू यांना विरोध करत त्यांना पत्र व पुस्तके पाठविली होती , म्हणूनच भाजप युवा मोर्चाने त्याला प्रत्युत्तर म्हणून आज कर्जतमध्ये प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोष्टाद्वारे ” जय श्रीराम ” लिहलेले पत्र पाठविण्यात आले . कर्जत पोष्ट ऑफिस बाहेर हे अभियान करण्यात आले .
या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे कर्जत पदाधिकारी सर्वेश गोगटे , यश घेवारे , भावेश देवघरे , ऋत्विक आपटे , मिहीर कुलकर्णी , राम ठाकरे , बोरसे सर , सुनिल गोगटे , मंदार मेहेंदळे, प्रमोद पाटील , सूर्यकांत गुप्ता , नितीश धामणकर , समीर सोहोनी, आणि इतर अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते .






Be First to Comment