सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
खालापुर तालुक्यातील असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र लोहप येथिल नव्याने बांधण्यात इमारत आज कोरोना लस देण्यासाठी सज्य झाली आहे.या नव्याने बांधलेल्या वास्तूची पाहणी करुन शासकीय अधिकारी आणी राजकीय,पालक मंत्री,जिल्हाधीकारी अदि अधिकारी यांनी पाहणी करुन या ठिकाणी वॅक्सीन सुरु करण्यास मानस दर्शविला होता.मात्र वाशिवली येथिल असलेल्या डॉ.पारनेकर महाराज विद्यालय वाशिवली,येथे ही वॅक्सीन सुरु होते.मात्र इमारती चे काम सुरु असल्यामुळे त्या ठिकाणी लसीकरण सुरु होते. मात्र या इमारतीचे काम पुर्ण झाल्यामुळे आज येथिल दवाखान्यात लस सुरु झाली आहे.
अखेर आज लोहप येथे श्रीफळ वाढवून या डोस देण्याचा सुभारंभ करण्यात आला.यावेळी येथे दुसरा डोस वॅक्सीन देण्याची सुरुवात झाल्यामुळें या परिसरातील लस घेण्यासाठी नागरिकांनी धाव घेतलेले पहावयास मिळाले.मात्र वॅक्सीन अल्प प्रमाणात आल्यामुळे अनेकांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला.या केंद्रामध्ये वॅक्सीन चे डोस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध झाल्यास लवकर लसीकरण पुर्ण होइल,शिवाय या ठिकाणी नागरिकांची गर्दि होणार नाही.
यावेळी या ठिकाणी डॉ. रोकडे – वैद्यकीय अधिकारी,डॉ.बी. निरगुडे आरोग्य साहाय्यक,ए. वाजे आरोग्य साहयिका,कांबळे,ठाकूर,पाटील,आरोग्य सेवेक ,तसेच रमेश पाटील – माजी सभापती,अनंता पाटील – उप सरपंच इसांबे ग्रूप ग्राम पंचायत,देविदास पाटील,अशोक पाटील,ग्रामस्थ प्रभाकर जाधव,हरिश्चंद्र पाटील,दर्शन पाटील गौरव घरत अदि उपस्थित होते.








Be First to Comment