सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे.तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना या विषाणूची सर्वत्र भीती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. परिस्थिती पाहता लहान मुलांचे लसीकरण व वैद्यकीय अधिकाऱ्यानां रूग्णांची तपासणी करण्यासाठी पी.पी.ई(surgical mask,hand gloves) किटची अत्यंत आवश्यकता असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांची तपासणी करून त्यांना सुदृढ करण्यासाठी महत्वाची भूमिका डॉक्टर बजावत आहेत.रूग्णांची तपासणी करताना गैरसोय होऊ नये,यासाठी पनवेल पंचायत समिती सदस्या तनुजा संजय टेंबे आणि भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष अॅंड.संजय मधुकर टेंबे यांनी पुन्हा एकदा दखल घेऊन डिंपल ड्रम प्रा.लिमिटेडचे मालक दिनेशशेठ हिराचंद कोटाडिया यांच्याकडे पी.पी.ई(surgical mask,hand gloves) किटची मागणी केली.यामागणीला अनुसरून तत्काळ मदत म्हणून पी.पी.ई किट,(surgical mask, hand gloves) उपलब्ध करून वाटप केले. त्या प्रसंगी वाटप करताना डिंपल कंपनीचे मॅनेजर शैलेश पांडे ,अॅंड.संजय टेंबे, कामगार प्रतिनिधी रघुनाथ भोईर,व्ही.पाटील आणि ज्ञानेश्वर भोईर,अंजुम काझी,सुहास कदम,दीपक काकडे,समीर नाईक, समीर पेंढारी, अमित रापटे,विलास कदम,महेंद्र टेंबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी डिंपल कंपनीचे मालक व मॅनेजर तसेच पंचायत समिती सदस्या तनुजा संजय टेंबे यांचे आभार मानले.






Be First to Comment