नेहुली कोव्हीड सेंटर मधून खिडकीचे गज कापून चादरीच्या साह्याने केले आरोपीने पलायन
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने तात्पुरत्या उभारलेल्या खंडाळे ग्राम पंचायत हद्दीतील नेहुली येथील कोविड कारागृहातून पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वा दोन च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे सकाळपासून एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला उपचारासाठी कैद्यांसाठी कोव्हिड केअर सेंटर असलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथून त्याने खिडकीतुन चादरच्या सहाय्याने पलायन केल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील सुमारे 69 कैद्यांना कोरोनाची 12 जुलै2021 रोजी लागण झाल्याची घटना घडली होती. जिल्हा कारागृहात कैद्यांची संख्या जास्त असल्याने यातील काही कैद्यांना नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या इमारतीत तात्पुरते कारागृह निगराणी कक्ष तयार करुन ठेवण्यात आले होते. त्यापूर्वी दोन कैदी दाखल होते.
या कैद्यांमध्ये पोलादपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेला नाईकू उर्फ देवा मारुती दगडे हा आरोपी होता. त्यास 16 जानेवारी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती व 19 जानेवारी 2018 पासून देवा दगडे हा जिल्हा कारागृहात दाखल होता.येथे दाखल असणाऱ्या कैद्यांच्या बंदोबस्तासाठी पाच ते सहा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. हे काही कैद्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक हे कोव्हिडं सेंटरच्या इमारतीच्या मागील बाजूस येत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.
20 जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कैद्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेल्या नेहुली येथील कोविड आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून सात चादरी एकमेकांना बांधून
त्याच्या साहाय्याने खाली उतरून दगडे याने पलायन केले. या आरोपीचे शिक्षण बारावी पर्यंत झालेवले आहे. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या देवा दगडे याची उंची 165 सेंमी आहे.
याबाबत कोणासही माहिती मिळाल्यास अलिबाग पोलीस ठाण्याला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.








Be First to Comment